[Kolhapur] - 'भाजपने युतीधर्म पाळल्यानेच मंडलिक खासदार'

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः 'लोकसभा निवडणुकीत भाजपने युतीधर्म पाळल्यानेच शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक खासदार झाले. त्याचे श्रेय 'आमचं ठरलंय' वाल्यांनी घेऊ नये', असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांना लगावला. आम्ही त्यांना मदत केली नसती तर धनंजय महाडिक पुन्हा खासदार झाले असते, असेही त्यांनी खासदार मंडलिकांना सुनावले.

भाजपच्यावतीने हॉटेल अयोध्या येथे महापुरात मदतकार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे नुतन राज्य उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावर गुरुवारी झालेल्या 'सतेज मेळाव्या'ची छाया होती. या मेळाव्यात, खासदार होण्यात सतेज पाटील यांची मदत झाली होती, असे प्रतिपादन मंडलिक यांनी केले होते. त्याचा धागा पकडत पालकमंत्री पाटील म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत भाजपने युतीधर्माचे पालन केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची अडीच लाख मते आहेत. ही मते मिळाल्याने मंडलिक खासदार झाले अन्यथा महाडिक खासदार म्हणून दिसले असते.'...

फोटो - http://v.duta.us/4UAvcwEA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P54zCAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬