[Kolhapur] - शंभर उद्योजकांचा विस्तार कर्नाटकात

  |   Kolhapurnews

@gurubalmaliMT

कोल्हापूर : सातत्याने पाठपुरावा आणि इशारा देऊनही महाराष्ट्र सरकारने औद्योगिक वीज बिलाबाबत दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतल्याने अखेर पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकात विस्तार करण्याचा निर्णय घेतला. शंभरावर बडे उद्योजक कर्नाटकची ही ऑफर स्वीकारून बुधवारी बेळगावला जाणार आहेत. येथे त्यांच्यात व कर्नाटक सरकारमध्ये करार होणार आहे. एका महिन्यात उद्योजकांना जागेचा ताबा देण्यात येणार आहे. उद्योग प्रक्रियेचा श्रीगणेशा दिवाळीलाच करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

राज्यातील औद्योगिक वीज दर कमी करावेत, यासाठी गेले सहा ते सात वर्षे उद्योजक प्रयत्नशील आहेत. मागेल त्याला प्लॉट, सुविधा द्याव्यात यासाठी लढा सुरू आहे. पण सरकार बदलले तरी धोरण बदलले नाही. त्यामुळे विजेचे दर कमी करा अन्यथा कर्नाटकात स्थलांतर करू, असा इशाराही उद्योजकांनी अनेकदा दिला. तरीही सरकारने गांभीर्य दाखवले नाही. त्यामुळे स्थलांतराचा निर्णय घेऊन गेले काही महिने हालचाली सुरू केल्या. त्याला आता मुहूर्त सापडला. कर्नाटक सरकारकडे 'गोशिमा'चे पदाधिकारी पाठपुरावा करत होते. त्याला यश मिळाले. राष्ट्रीय महामार्गावरील कणंगला इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये या उद्योजकांना स्वस्तात प्लॉट, कमी दरात वीज आणि केवळ चार टक्के दराने कर्ज देण्यास कर्नाटकने मान्यता दिली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या प्रतिनिधीने कोल्हापुरात येऊन उद्योजकांशी चर्चा केली. त्याने दिलेल्या प्रस्तावास सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग आला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4R7u2gEA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬