[Mumbai] - आता मुंबईतील २४ उद्याने २४ तास खुली राहणार

  |   Mumbainews

मुंबई: महापालिकेने मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी शनिवारी हा निर्णय जाहीर केला. उद्याने २४ तास खुली राहाणार असल्याने त्यामधील सुरक्षा व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले असून उद्यानांचे रक्षण आणि देखभाल ही उद्याने खुली असतानाच करावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. येत्या सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबईत दिवसाढवळ्या सुरू असलेली गुन्हेगारी व इतर प्रकार पाहाता उद्याने २४ तास खुली ठेवणे कितपत योग्य असा सवाल केला जात आहे.

मुंबई महापालिकेची शहर आणि उपनगरात मिळून सुमारे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही उद्याने महत्वाची आहेत. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत विविध भागांतील २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. उद्याने २४ तास खुली ठेवण्यासाठी उद्यांनाच्या प्रवेशद्वारांवर सुधारित वेळांचे फलक तातडीने लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे....

फोटो - http://v.duta.us/_rHLjQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PmU6wQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬