[Mumbai] - आरे हा इतिहास होऊ देऊ नका

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आरेमध्ये सुरुवातीला मेट्रो ३ कारशेडचा प्रस्ताव आला. त्यानंतर प्राणी संग्रहालय, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, मेट्रो भवन आणि आता मेट्रो ६ संदर्भातील चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो मार्गांसोबतच मेट्रो भवनाचेही भूमिपूजन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकार विकासाचे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये रेटून नेणार या भीतीने आरे इतिहास होऊ देऊ नका, अशी हाक मुंबईकरांनी दिली आहे. एकीकडे मेट्रो तुमच्या भल्यासाठीच आहे, याच्या जोरदार जाहिराती सुरू असताना दुसरीकडे जंगलाचा विनाश हा आपल्या मुळावर येऊ शकतो याची जाणीव करून देण्यासाठी विविध मोहिमा, आंदोलनांना सुरुवात झाली आहे.

आरे संवर्धन गटासोबत जोडल्या गेलेल्या मुंबईकरांना आता मुंबईतील इतर महाविद्यालयीन युवकांचे गट, पर्यावरणप्रेमी सक्रिय पाठिंबा देत आहेत. शनिवारी ७ सप्टेंबरला, चर्चगेट येथे आरेला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होणार आहे, तसेच सोशल मीडियावर ट्विटेथॉन राबवण्यात येणार आहे. आरेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. रविवारी आरे येथील बिरसा मुंडा चौक येथेही आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आता अनेक ठिकाणी ही आंदोलने होण्याची शक्यता आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/keHziAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬