[Mumbai] - दया पवार स्मृति पुरस्कारांची घोषणा

  |   Mumbainews

मुंबईः पद्मश्री दया पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, मेघना पेठे, शीतल साठे आणि मलिका अमर शेख यांना यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अकरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला 'बलुतं' पुरस्कार यंदा डॉ. मंगेश बनसोडे यांना जाहीर झाला आहे. डॉ. बनसोडे बलुतं पुरस्काराचे दुसरे मानकरी ठरले आहेत. ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या 'जूठन' या आत्मकथनाच्या 'उष्ट' या मराठी अनुवादासाठी डॉ. बनसोडे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 'बलुतं'च्या चाळीशीनिमित्त ग्रंथालीतर्फे 'बलुतं' पुरस्कार देण्यात येतो.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ सभागृह, मुंबई येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिमा जोशी, डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि डॉ. रावसाहेब कसबे हजर राहणार आहेत. या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन हिरा पवार यांनी केले आहे.

फोटो - http://v.duta.us/OZqn6QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/aLAZugAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬