[Mumbai] - दुर्गप्रेमींमध्ये संताप

  |   Mumbainews

पुरातन वास्तूंचे स्वरूप न बदलण्याचे आवाहन

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पर्यटनाला आणि त्यातून स्थानिकांना रोजगारनिर्मितीसाठी चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील गड-किल्ले हेरिटेज हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी देण्यासंदर्भातील बातमीमुळे राज्यभरातील दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. १०० वर्षांपूर्वीच्या वास्तूंना कायद्यानेच संरक्षण मिळत असल्याने हे गड-किल्ले संरक्षित यादीमध्ये असले किंवा नसले, तरी या गड-किल्ल्यांवर बांधकाम होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका दुर्गप्रेमींनी घेतली आहे. या बांधकामांमुळे उद्योजकांचे खिसे भरतील मात्र गड-किल्ल्यांचे संवर्धन होणार नाही, ही भीती व्यक्त करण्यात आली असून ती राज्य सरकारपर्यंत पोहोचवली जात आहे.

यासंदर्भात ज्येष्ठ गिर्यारोहक आणि भारताच्या पहिल्या यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहिमेचे नेते हृषिकेश यादव यांनी गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींच्या प्रातिनिधिक भावना व्यक्त करताना पुरातन वास्तूंचे स्वरूप बदलू नका असे आवाहन केले. हा अभिमानाचा विषय आहे. ज्या वास्तूंचा इतिहास शिकायचा आणि त्यापासून प्रेरणा घ्यायची, तिथे जाऊन लग्नसोहळे पाहायचे हे रुचणारे नाही, अशी चर्चा गिरीप्रेमींमध्ये सुरू आहे. हॉटेल आणि लग्नसमारंभासाठीचे स्थळ म्हणून यांचे रूपांतर झाले, तर त्याचा फायदा स्थानिकांना होण्याची शक्यता कमी आहे. स्थानिकांना केवळ भांडी घासण्याची किंवा स्वच्छतेची कामे मिळणार. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गाइडची सोय, किल्ल्यांजवळील गावामध्ये जेवणाची सोय करण्यासाठी चालना द्यावी, असाही उपाय यादव यांनी सुचवला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LCnyhgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬