[Mumbai] - नको फुले, पेढे... देऊ वह्या-पुस्तके!

  |   Mumbainews

बुद्धिदात्याच्या उत्सवात जपले समाजसेवेचे व्रत

लोगो - माझ्यात आहे सुखकर्ता

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करण्याबरोबरच काही मंडळींनी समाजसेवेचे व्रतही हाती घेतले आहे. गजाननाची सेवा करतानाच समाजभान दाखवित, गरजवंतांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांचा वाटा खारीचा असला, तरी मोलाचा आहे. कुणी आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करतेय, तर कुणी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले आहे. अशा अनेकांनी प्रत्यक्ष सुखकर्ता बनत अंगिकारलेल्या समाजसेवेच्या व्रताविषयी जाणून घेऊ...

समाजसेवी संस्थेला देणगी

बोरिवलीला राहणारे महेश घाणेकर यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजींकडून करून घेण्याऐवजी गेल्या तीन वर्षांपासून ते स्वत: गणेशपूजा करतात. गुरुजींना दक्षिणा म्हणून देण्यात येणारी रक्कम, तसेच बाप्पाला भक्तांनी वाहिलेले पैसे यात आणखी भर घालून ती एकूण रक्कम एका समाजसेवी संस्थेला देतात. यावर्षीही त्यांनी त्यांच्या घरी येणाऱ्या गणेशभक्तांना आवाहन केले होते, की 'बाप्पाच्या दर्शनाला येताना कृपया कापूर, अगरबत्ती किंवा पेढे वगैरे आणू नये. त्याऐवजी तुम्हाला जमेल तशी रक्कम गणरायापुढे ठेवावी. ही रक्कम नंतर समाजसेवी संस्थेला देण्यात येईल.' यंदा त्यांच्या घरच्या बाप्पासमोर १ हजार ८२२ रुपये जमा झाले आहेत. त्यात आणखी काही रकमेची भर घालून ते एका समाजसेवी संस्थेला दान करणार आहेत....

फोटो - http://v.duta.us/o1kudgEA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OTTN6QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬