[Mumbai] - नरेश गोयल यांची 'ईडी'कडून चौकशी

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईटी) विदेशी चलन कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी चौकशी केली. गोयल यांच्या घराची झडती घेतल्यानंतर प्रथमच 'ईडी'कडून त्यांची चौकशी झाली आहे.

फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत 'ईडी'ने गोयल यांचा जबाब नोंदवला. 'ईडी'च्या बेलार्ड पीअर येथील विभागीय कार्यालयात गोयल यांची चौकशी झाल्याचे सांगण्यात येते. एतिहाद एअरवेजला जेटमधील हिस्सा विकण्याच्या व्यवहाराबाबत 'ईडी'कडून तपासणी सुरू आहे. यापूर्वी गोयल यांच्या मुंबईतील निवासस्थानाप्रमाणेच कंपनी कार्यालये, संचालकांच्या कार्यालयासह जेट एअरवेजच्या कार्यालयासह सुमारे १२ ठिकाणांची ऑगस्टमध्ये झडती घेतली होती. गोयल यांच्या वैयक्तिक १९ खासगी कंपन्या असून, त्यातील पाच कंपन्यांची नोंदणी परदेशात झाल्याचे 'ईडी'तील सूत्रांचे म्हणणे आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jFl-DwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬