[Mumbai] - सात महिन्यात मुंबईत १३७ जणांचा मृत्यू

  |   Mumbainews

मुंबई: मुंबईत झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या सात महिन्यांत मुंबईत १३७ जण दगावले असून ५७९ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. झाड पडणे, आगीच्या घटना, रस्ते अपघात, शॉर्ट सर्किट, इमारत कोसळणे आदी घटनांमध्ये १३७ जण दगावल्याचं माहितीच्या अधिकारातून उजेडात आलं आहे. तर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सात महिन्यांत जवळपास १० हजार तक्रारी मिळाल्याचंही उघड झालं आहे.

अधिकार फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते शकिल अहमद शेख यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती उजेडात आणली आहे. यावर्षी मालाड येथे १ आणि २ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्री भिंत कोसळल्याने झालेली दुर्घटना आणि पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच १० जुलैला गोरेगावच्या वीरभट्टी आंबेडकर चौक परिसरातील १८ महिन्यांचा दिव्यांश सिंग हा गटाराचे झाकण उघडे असल्याने गटारात पडला आणि वाहून गेला. हे गटर झाकलेले नव्हते, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/ZeMO0wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PUY-5gAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬