[Mumbai] - सेना-भाजपमध्ये जागा वाटपाबाबत संभ्रम

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः सार्वत्रिक निवडणुकीतील जागावाटपासाठी शिवसेना भाजप युतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र झडण्याची परंपरा इतिहासजमा झाली असून आता जागावाटपातील गोपनीयता राखण्यासाठी केवळ पक्षातील नेतृत्व आणि मर्जीतील एक दोन नेते यांच्यामध्येच जागावाटपाची चर्चा होऊ लागल्याचे सूत्रांकडून समजते. राज्याच्या पातळीवर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यापुरतीच जागावाटपाची चर्चा मर्यादित राहिल्याने दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते, उमेदवार यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती आणि आघाडीमध्ये जागावाटपाच्या चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युती सर्वात जुनी असून यापूर्वी युतीच्या जागावाटपांच्या मॅरेथॉन बैठका व्हायच्या. शिवसेनेकडून मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम यांच्यापासून ते अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर अशी सर्व मंडळी तर भाजकडून दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंडळी जागावाटपाच्या बैठकांमध्ये सहभागी होत. बऱ्याचदा जागावाटपावरून नेत्यांमध्ये हमरीतुमरी व्हायची. २०१४ ज्या लोकसभा तसेच विधानसभा जागावाटपाच्या बैठकांमध्येही दोन्हीकडच्या नेत्यांचा समावेश होता....

फोटो - http://v.duta.us/37nk_wAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BgyzoQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬