[Mumbai] - १४ वाहनतळांचा कमी वापर

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी पालिकेने सार्वजनिक वाहनतळ सुरू केले असली तरी १४ सार्वजनिक वाहनतळांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या वाहनतळांच्या परिसरात आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवर अवैध पार्क केल्या जाणाऱ्या खासगी बसगाड्यांना बेस्ट डेपोंमध्ये सशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत शालेय बस संघटनेने केलेल्या विनंतीनुसार शालेय बसकरिता शुल्कामध्ये कपात करण्यात येणार आहे. हे सुधारित दर लवकरच निश्चित केले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले.

मुंबईतील पार्किंग आणि वाहतुकीबाबत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी पालिकेत एका समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, वाहतूक पोलीस खात्याचे सहआयुक्त मधुकर पांडे, पालिकेच्या मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा, तज्ज्ञ सदस्य शिशिर जोशी व बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे उपस्थित होते....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6HKTIgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬