[Nagpur] - अग्निशमनची कामे तात्काळ करा

  |   Nagpurnews

म. टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर शहरात विविध ठिकाणी अग्निशमन सुविधांच्या निर्मितीची आवश्यकता आहे. यात प्रामुख्याने शहरात ११६ नव्या हायड्रण्टचा प्रकल्प रखडला आहे. याशिवाय अनेक अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या इतर कामांमधील अडथळे दूर करून संबंधित कामांना गती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती संजय बालपांडे यांनी हे निर्देश दिले आहेत. बुधवारी अग्निशमन व विद्युत विशेष समितीतर्फे कामांचा आढावा घेण्यात आला. यात अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती संजय बालपांडे यांनी प्रलंबित कामांच्या संदर्भात काही निर्देश दिले. बैठकीत नागपूर शहरामध्ये नवीन ११६ हायड्रण्टची निर्मिती करण्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. शहरात नवीन ११६ हायड्रण्ट निर्मिती करण्याचे कार्य अनेक दिवसांपासून सुरू आहे. नागरिकांची सुरक्षा आणि सुविधेच्यादृष्टीने या कामाला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतींनी यावेळी दिले. याशिवाय शहरविकास आराखड्यामध्ये अग्निशमन स्थानाकरिता झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा येथील जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. याबाबत संबंधितांसोबत समन्वय साधून जागा त्वरित ताब्यात घेणे तसेच राठोड लेआउट येथील अग्निशमन केंद्राकरिता असलेल्या जागाही त्वरीत ताब्यात घेण्याबाबत त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. याशिवाय शहरविकास आराखड्यामध्ये अग्निशमन स्थानकाकरिता आरक्षित असलेल्या झिंगाबाई टाकळी, अंबाझरी, चिंचभवन, परसोडी व सोमलवाडा या जागा ताब्यात घेणे, नव्‍याने बांधण्यात आलेल्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन स्थानकाचे उद्घाटन, अग्निशमन विभागातील जुने स्थानक लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील जुने स्थानक पुनर्बांधकाम करणे, राठोड लेआउट येथील अग्निशमन स्थानकाकरिता असलेल्या जागा ताब्यात घेणे, वाठोडा अग्निशमन स्थानकाचे बांधकाम करणे, पथदिव्यांच्या दुरुस्तीकरिता व सुस्थितीकरिता नियुक्त एजन्सीची कामगिरी, एलएडी विद्युत दिवे लावल्यानंतर मनपाला होणारा फायदा, सर्व प्रभाग अंतर्गत बंद असलेले विद्युत दिवे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. अग्निशमन विभागातील लकडगंज, गंजीपेठ, न्यू कॉटन मार्केट पाचपावली विभागातील स्थानक जवळपास शंभर वर्षे जुने आहेत. त्यामुळे स्थानकांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत. या स्थानकांच्या पुनर्बांधकामाचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत आवश्यक पाठपुरावा करुन कार्य लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश बालपांडे यांनी दिले. बैठकीला उपसभापती निशांत गांधी, सदस्या वंदना भुरे, सदस्य संदीप गवई, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YSwtYQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬