[Nagpur] - इव्हीएमच काय, बॅलेटमध्येही जिंकूः आठवले

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरः 'मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान जिंकले तेव्हा इव्हीएम खराब नव्हते. मोदी जिंकले म्हणून इव्हीएमविरुद्ध ओरड केली जात आहे. परंतु, इव्हीएमच काय बॅलेटवरही निवडणुका जिंकून दाखविता येईल,' असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. 'शरद पवार हे आदरणीय नेते आहेत. परंतु, मोदी हे सुपर पॉवर नेते आहेत,' असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

केंद्रात सत्तेत आलेल्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री बनण्याची संधी मला मिळाली. दलितांची मते मिळाल्याने भाजपलाही मदत झाली. मोदी सरकारने जनतेच्या हितार्थ अनेक निर्णय घेतलेत. 'मुद्रा योजना', 'जनधन योजना', 'उज्ज्वला गॅस योजना' यासारख्या योजनांमध्ये लाखोंना फायदा मिळाला. मोदी सरकार लोकहिताच्या योजना राबवित असल्याने व विरोधकांचा सातत्याने पराभव होत असल्यामुळेच इव्हीएमवर खापर फोडले जाते. बॅलेटने निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा. विरोधकांनी त्यांना इव्हीएम खराब असल्याचे पटवून द्यावे, असे सांगत बॅलेटनेही निवडणूक जिंकता येईल, असे आठवले यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/lyL9kAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qghajQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬