[Nagpur] - कुलसचिव पदाकरिता आज मुलाखती

  |   Nagpurnews

विद्यापीठ वर्तुळात उत्सुकता शिगेला

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिव पदाकरिता आज, शनिवारी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. तब्बल वर्षभरानंतर विद्यापीठात नियमित कुलसचिव नियुक्त होत असून त्या पदावर कोणाची वर्णी लागणार, त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

माजी कुलसचिव पूरण मेश्राम यांची जून २०१८मध्ये निवृत्ती झाल्यापासून विद्यापीठातील कुलसचिव पद रिक्त होते. त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार काही महिने डॉ. नीरज खटी व डॉ. विनायक देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरानंतर अता कुलसचिव पदाकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. त्या पदाकरिता सुमारे २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातून आता सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.

विद्यापीठात शिक्षण मंचचा दबदबा आहे. त्यामुळे मंचाकडूनच कुलसचिव पदाकरिता उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. त्यात शिक्षणाचे पदाधिकारी असलेले आणि विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीची निवड होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विद्यापीठाला यंदा प्रथमच पदव्युत्तर विभागाबाहेरील कुलसचिव प्राप्त होण्याची शक्यता आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7HI2aQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬