[Nagpur] - नागपूरला धो धो धुतले

  |   Nagpurnews

विजांचेही तांडव : रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प; आज सतर्कतेचा इशारा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी शहराला धो धो धुतले. संपूर्ण नागपुरातील रस्ते जलमय झाल्याने अनेक चौकांमधील वाहतूक ठप्प झाली होती. विविध परिसरांमधील वस्त्यांमध्येही पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. ऐन गौरीपूजनाच्या वेळीच पावसाचा जोर वाढल्याने घरोघरी धावपळ‌ दिसली. आज, शनिवारी शहरात परत एकदा अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाला सतर्कतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या अतिवृष्टीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा रद्द करावा लागला आहे.

शुक्रवारी सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. दुपारी एकनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. संपूर्ण शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NtJg2wAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬