[Nagpur] - प्राचीन भारतीय गणितावर होणार मंथन

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा वेदांग ज्योतिष विभाग, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथील गणित विभाग आणि इंडिक अॅकडेमी, हैदराबाद यांच्या वतीने गणितशास्त्रावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. व्हीएनआयटीच्या गणित विभागात ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान ही कार्यशाळा होणार आहे.

भारतातील प्रख्यात गणितज्ज्ञ तसेच संस्कृत विद्वान गुलबर्गा येथील वेणुगोपाल हेरूर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे आणि इंडिक अकादमीचे व्यवस्थापकीय विश्वस्त हरी किरण वडलमानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार आहे. नागपुरातील नुकतेच निवर्तलेले गणितज्ज्ञ आणि वैदिक गणित चळवळीचे खंदे पुरस्कर्ते डॉ. अनंत व्यवहारे यांच्या स्मृतीला ही कार्यशाळा समर्पित करण्यात आली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wWOhmAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬