[Nagpur] - मेडिकल, मेयोचे वॉर्डही जलमय

  |   Nagpurnews

नागपूर : पावसाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चांगलीच तारांबळ उडविली. मेडिकलमधील शल्यक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग, मेडिसिनचा वॉर्ड आणि मेयोतील नेत्रविभागाचे वॉर्ड जलमय झाले.

मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक २५ आणि २६ क्रमांकाच्या वॉर्डातही पाण्यचा लोंढा शिरला. त्यामुळे रुग्णांना तातडीने वॉर्ड क्रमांक २७ मध्ये हलविण्यात आले. आकस्मिक विभाग तर गुडघाभर पाण्यात बुडाला. शुक्रवारी तब्बल सहा तास झालेल्या संततधार पावसाने मेयोतही तारांबळ उडाली. जलमय झालेल्या मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक २५ने जुलै २०१३मध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या आठवणी ताज्या केल्या. त्या पावसाने मेडिकलमधील अनेक वॉर्ड रात्रीच्यावेळी पाण्यात बुडाले होते. मुसळधार पावसामुळे मेडिसिन विभाग, सर्जरी विभागातही चार फुटांपर्यंत पाणी जमा झाले होते. याशिवाय मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक १७, १८, २७, ३६ समोरही पाण्याचा तलाव झाला होता. मेडिकलचे औषधालय तळघरात आहे. तेथेही पावसाचे पाणी शिरल्याने कोट्यवधीची औषधे पाण्यात गेल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/tfelEAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬