[Nagpur] - संविधान बदलणाऱ्यांचा सत्यानाश होईल

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

'आपण मंत्रिपदासाठी भाजपसोबत गेलो नाही. किमान कार्यक्रम होता, म्हणून सहभागी झालो. समाजाला सत्तेत वाटा हवा आहे. हा वाटा प्रश्न सोडविण्यासाठी फायद्याचा ठरेल. म्हणून संविधान बदलविण्याची भाषा कुणीही करू शकत नाही. जो संविधान बदलविण्याचा प्रयत्न करेल, त्याचा सत्यानाश होईल. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पक्षाच्याच मेळाव्यात आरक्षण कायम ठेवण्याची व संविधान न बदलविण्याची ग्वाही दिली. धाडस केलेच तर त्यांना भोगावे लागेल,' असा इशारा केंद्रीय सामा​जिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.

देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय महामेळाव्यात आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर होते. सरचिटणीस मोहनलाल पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले, रिपाइंचे गटतट असले तरी हे पक्ष नावाने काम करणारे आहेत. हा पक्ष केवळ दलितांचाच नाही, तर सर्व समाजाचा आहे. या पक्षाला वाढविण्याचे काम केल्याने आज देशातील ३३ राज्यांत हा पक्ष आहे. विचारवंतांची पक्षाला जोड मिळावी, भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करीत युतीसोबत जाण्यापूर्वी भीमशक्ती-शिवशक्तीमुळे सत्ता येईल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांच्यासोबत गेल्यानेच दुसऱ्यांदा केंद्रात सत्ता आली. त्याचा वाटा आपल्या पक्षालाही मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कुणी अवमान केल्यास टराटरा फाडू, असा इशाराही दिला. मोदी पंतप्रधान असेल तोवर रिपाइं सोबत राहील. संविधान बदलणार नाही, असा शब्द दिला आहे. त्याला हात लावल्यास परिणामही भोगावे लागतील. कार्यकर्त्यांनी सहकारी संस्था, पतसंस्था, सुतगिरणी आदी उभ्या कराव्यात. सत्तेतही वाटा मिळवून देऊ. मात्र, ताठ मानेने जगावे. गुलामगिरी न करणारी बाबासाहेबांची चळवळ आहे, हे देखील लक्षात ठेवावे. पँथरने चळवळीतील कार्यकर्त्यांना मदत केली. त्यामुळे चळवळीत प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे आज चार पाच मंत्रिपदे आहेत. पुढील काळात ४० ते ५० जणांना महामंडळ मिळेल, असे संकेतही आठवलेंनी दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iOFUbgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬