[Nashik] - आपत्ती व्यवस्थापनाचे संघ तयार व्हावेत

  |   Nashiknews

भोंसला अॅडव्हेंचर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची भावना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'शहरात चार ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या पुराच्या भयानक स्थितीत सर्वात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी, की नैसर्गिक आपत्तीत असंख्य माणसांना मदतीची गरज असते. त्यासाठीची साधनेही प्रशासनाजवळ पूरक आहेत. पण ती साधने कशी वापरावीत याचा अनुभव असलेल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची फळी म्हणावी तशी मजबूत नाही. या स्थितीत आपत्कालीन प्रसंगात बचावकार्याला खूपच मर्यादा पडू शकतात. यावर उपाय म्हणून भविष्यात आपत्ती व्यवस्थापनाचे संघ तयार होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले पाहिजेत..', हे शब्द आहेत शहरातील पूरात ७७ नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या भोंसला अॅडव्हेंचर फाउंडेशन टीमचे समन्वयक संतोष जगताप यांचे.

जगताप व त्यांच्या आणखी सात सहकाऱ्यांनी पुरामध्ये जीवावर उदार होत अनेक नागरिकांच्या जीवात जीव आणला. फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या श्री गणेश आरतीचा मान भोंसला अॅडव्हेंचर फाउंडेशनला देण्यात आला. यावेळी या टीमचे समन्वयक संतोष जगताप आणि त्यांचे सहकारी योगेश सहारे यांच्या हस्ते 'मटा' कार्यालयात गणेश आरती करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NK4zkwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬