[Nashik] - एकतर्फी प्रेमातून तरुणीवर १८ वार

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, निफाड

लासलगाव येथील दत्तनगर परिसरात शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आतिश ढगे नावाच्या माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून बारावीत शिकणाऱ्या युवतीवर धारदार शस्त्राने तब्बल १८ वार करीत तिला गंभीर जखमी केले.

मुलीचा ओरडण्याचा आवाज येताच कॉलनीमधील नागरिक जमा झाल्याने ढगे याने स्वत:च्या अंगावरही वार करून घेतले. घटनास्थळी अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तरुणासह गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले. जखमी युवतीला लासलगाव येथील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी नाशिकला पाठविण्यात आले, तर तरुणावरही निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लासलगाव परिसरात खळबळ उडाली असून, आज, शनिवारी लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे. या तरुणाबरोबर आणखी तिघे जण असल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर त्यांनी पळ काढला.

फोटो - http://v.duta.us/09ri8QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fnQvIwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬