[Nashik] - गणेशोत्सवः गौरींचे आज होणार विसर्जन

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः गणरायाच्या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशीण घरी येते. गणपती स्थापनेनंतर येणारा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठागौरींचे आगमन असतो. या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीतसुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व समाधान असते. आज शनिवार (दि. ७) हा गौरींच्या विसर्जनाचा दिवस आहे.

गौरी साधारणपणे तीन दिवस असतात. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा पूजनाचा आणि तिसरा विसर्जनाचा. गौरींचे विसर्जन जेथे केले जाते, त्या नदी तलावातील काही दगड आणून ते घरी ठेवण्याची पद्धत आहे. सुखसमृद्धी आणि पिकांची भरघोस वाढ व्हावी, ही त्यामागची श्रद्धा आहे. गौरी पूजनाचा शुक्रवारी दिवस होता. ज्येष्ठ नक्षत्रावर तिचे पूजन करण्यात येते. घरातील पुरुषांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर गौरींची त्यांच्या बाळांची पूजा बांधण्यात आली. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला. हा नैवेद्य विशेष पद्धतीचा होता. त्यात १६ भाज्या, १६ प्रकारच्या विविध चटण्या आणि पंचामृताचा समावेश होता. काही ठिकाणी कणकेचे सोळा दिवेदेखील लावले जातात. धान्यांनी भरलेल्या डब्यांवर गौरीचे मुखवटे बसविण्यात आले....

फोटो - http://v.duta.us/LPWWigAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cieq5wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬