[Nashik] - गोल्फ क्लबवर वादाचा ‘ट्रॅक’

  |   Nashiknews

सायकल ट्रॅक, सेल्फी पॉईंटला जॉगर्स क्लबचा विरोध

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान अर्थात गोल्फ क्लबच्या तब्बल ११ कोटी रुपये खर्चून होत असलेल्या नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या सायकल ट्रॅकसह काही कामांना जॉगर्सने विरोध केला असून, ही कामे करू नये अशी मागणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.

महापालिका व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून गोल्फ कल्ब मैदानाचे नूतनीकरण, तसेच सुशोभिकरण केले जाणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी यासाठी शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यासाठी ११ कोटी २७ लाख ५३५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे गोल्फ क्लब मैदान कात टाकणार आहे. परंतु, या मैदानात काही सुविधांमध्ये बदल केले असून, त्यास जॉगर्सचा विरोध आहे. या मैदानावर करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आम्ही समाधानी आहोत. मात्र या ठिकाणी होत असलेल्या सायकल ट्रॅकला आमचा विरोध आहे. या ठिकाणी सायकल ट्रॅक झाल्यास येथे लहान मुलांचा वावर वाढेल. त्यांच्या सायकली ट्रॅकवरून जॉगिंग ट्रॅकवर आल्यास नागरिकांना दुखापती होतील. त्यामुळे येथे सायकल ट्रॅक करू नये, अशी मागणी जॉगर्सनी केली आहे. याबाबत जॉगर्सने आयुक्तांची भेट घेतली असून, संभाव्य धोक्याबाबत कल्पना दिली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. त्याचाही व्यायामप्रेमींना त्रास होणार असल्याचे जॉगर्सचे म्हणणे आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/R1jPfgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬