[Nashik] - थेट रस्त्यावर मांडला बाजार

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरातील मुख्य रस्त्यावर रोज भरणाऱ्या बाजारामुळे भाविकांना चालण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नसल्याचे रोजच नजरेस पडत आहे. शहरातील भाजी बाजारास वेगळी जागा नसल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर ते कुशावर्त तीर्थ हा भाग मेनरोड म्हणून ओळखला जातो. याच मेनरोडलगत गोदावरी नदीपात्रावर ७० वर्षांपूर्वी स्लॅब टाकून रहदारीसाठी सोयीचे होईल असा फूटपाथसह रस्ता तयार करण्यात आला. सिंहस्थातील सर्व आखाड्यांचा शाहीमार्ग, त्र्यंबकेश्वराजाचा सोमवारचा हा पालखी मार्ग, रथोत्सवाचा तसेच शहरातील मिरवणुकांचा मुख्य रस्ता हाच आहे.

सन २००३च्या सिंहस्थपासून सुरक्षेच्या कारणास्ताव मेनरोड गंगास्लॅबच्या दोन्ही बाजूस आणि इतर ठिकाणी जागोजाग बॅरेकेडिंग करून मेनरोड परिसराचा श्वास आवळला गेला आहे. धोबी गल्ली हा एकमेव रस्ता रहदारीसाठी असताना येथील भाजीबाजारास पर्यायी जागा देणे नगर पालिकेला १२ वर्षात शक्य झालेले नाही. गंगास्लॅब भाजी व्रिक्रेते आणि अन्य व्यवसायिकांनी व्यापला आहे. तर डाव्या बाजूचा रस्यावर देखील व्यवसायिक दुकाने लावतात. मंगळवारच्या आठवडे बाजराच्या दिवशी शेतकऱ्यांनी आणलेला माल विकण्यास येथे जागा शिल्लक नसते. सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनी गंगास्लॅबर दोनशे ते चारशी फूट लांबीचे मांडव टाकले आहेत. त्यामुळे तेथील व्यवसायिक थेट रस्त्यावर आले आहेत. डाव्या बाजूच्या रस्त्यावर दुतर्फा व्यवासायिक आणि उजव्या बाजुच्या रस्त्यावर उभी केलेली वाहने अशी परिस्थिती असतांना भाविकांनी चालयचे कसे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर पालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांसह भाविकांच्या रहदारीचे अक्षरश: बारा वाजले आहेत.

फोटो - http://v.duta.us/mIkoLgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WTvMLQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬