[Nashik] - नाशिकः राज्यात ‘ग्रीन रोड’ची निर्मिती होणार

  |   Nashiknews

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील सुमारे ९० हजार किलोमीटर रस्ते आता 'ग्रीन रोड' साकारला जाणार आहे. अगोदर याचा पथदर्शी प्रकल्प नाशिक जिल्ह्यात करण्यात आला. त्यानंतर आता ते राज्यभर केले जाणार आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास न करता हे रस्ते तयार केले जात आहे. विशेष म्हणजे त्यात रस्त्यावरील खडी, माती, मुरूम मध्ये सिमेंट आणि विशिष्ट रसायने मिसळून हे रस्ते तयार केले जातात.

सॉईल स्टेबिलायझेशन तंत्रज्ञान वापरून करण्यात येणाऱ्या या रस्त्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात टप्प्याटप्प्याने राज्यात पारंपारिक रस्ते निर्मितीच्या तुलनेत कमी कालावधीत हे रस्ते तयार होणार आहे. विशेष म्हणजे हे रस्ते मजबूत व टिकाऊ असून पावसाच्या पाण्यापासून या रस्त्याचे नुकसान टळणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार घेतल्यावर अधिकाऱ्यांना खर्चात बचत करण्यासोबत पर्यावरणपूरक प्रकल्पावर लक्ष देण्याबाबत भर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नाशिकमध्ये हे प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले आणि अधीक्षक अभियंता रणजीत हांडे यांनी केले....

फोटो - http://v.duta.us/z0qAHAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/t9ypsAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬