[Nashik] - मोबाइल चोरट्याचा तरुणावर हल्ला

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील अहिल्याबाई होळकर पुलावरून जात असतांना एका तरुणावर मोबाइल चोरट्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. ५) रात्री घडला. हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.

रतिलला विनायक पवार (वय २८, रा. उपकार थिएटरमागे, मालेगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. वीज महावितरण कंपनीत कर्मचारी असलेला रतिलाल गुरुवारी रात्री मेसवर डबा घेण्यासाठी जात होता. त्याचवेळी मोसम नदीवरील होळकर पुलाजवळ अंधारात अज्ञात व्यक्तीने मोबाइलवर बोलत जाणाऱ्या रतिलालच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने प्रतिकार केला. लुटमारी फसण्याच्या भीतीने चिडलेल्या चोरट्याने रतिलालवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. चोरटा मोबाइल घेऊन पळाला. काही नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला तत्काळ पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kys4hQEA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬