[Navi-Mumbai] - एसटीतून मतपेरणी

  |   Navi-Mumbainews

'एसटी'तून मतपेरणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

आगामी १५ दिवसांत आचारसंहिता लागू होण्याचे संकेत देताना एसटी महामंडळाच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनुपस्थितीत तब्बल ६०० कोटींच्या कामांची घोषणा शिवसेनेने केली. विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित शिवाई बस एसटी ताफ्यात गुरुवारी समावेश करण्यात आला. यावेळी मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाचे ४९ मजली टॉवर आणि विद्याविहार येथे एक हजार घरांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेंतर्गत आंतर-शहर वाहतूकीसाठी विद्यूत बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानूसार देशातील पहिली वातानुकूलित विद्यूत बस 'शिवाई' महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली. अद्याप ही बस कोणत्या मार्गावर धावणार याबाबत निर्णय झालेला नाही. आठवड्याभरात खासगी कंपनी आणि महामंडळाच्या संयुक्त बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल. एकूण १५० इ-बस ताफ्यात येणार असून यापैकी ५० बससाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/4MKOGQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yTBAewAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬