[Navi-Mumbai] - कांदा ४० रु किलो

  |   Navi-Mumbainews

नवी मुंबई : पावसाचा फटका बसल्याने राज्यात सर्वत्र कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या या वर्षीच्या एकूण उत्पादनापैकी केवळ २५ टक्के कांदा शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात मागील तीन महिन्यांपासून कांद्याची आवक मंदावली आहे. परिणामी कांद्याची मागणी पूर्ण होत नसल्याने कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात १० ते १२ रु किलो असलेला कांदा शुक्रवारी २४ ते २८ रुपये किलो झाला आहे. यामुळे किरकोळमध्येच कांदा ४० रुपये किलो झाला आहे. येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून लागलेला पाऊस अजूनही कोसळतच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा पाणी लागल्याने पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याची कमतरता जाणवू लागली आहे. मुंबईची कांद्याची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज बाजारात शंभर सव्वाशे गाड्या कांद्याची आवक गरजेची आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून ही आवक साठ-सत्तर गाड्यांवर आली आहे. साठवणुकीच्या कांद्यालाही पाणी लागल्याने तो ओलसर होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lk0-LAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬