[Navi-Mumbai] - गड किल्ले दोन्ही बाजू

  |   Navi-Mumbainews

गडकिल्ले भाड्याने देण्याचे वृत्त चुकीचे

खुलासे करून बाजू सावरण्यासाठी सरकारची धावाधाव

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रातील गडकिल्ले हेरिटेज हॉटेल, लग्न समारंभ आणि खाजगी पार्टी करण्यासाठी विकासकांना राज्य सरकार भाडेतत्वावर उपलब्ध करुन देणार असल्याच्या बातमीमुळे विरोधी पक्षांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. शिवप्रेमी नागरिकांनीही सोशल मिडियाच्या माध्यमातून आपला तीव्र संताप व्यक्त केला. अखेर हे वृत्त चुकीचे असल्याचे खुलासा करुन पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतहासिक अर्थानेच जपले जातील. त्याचे पावित्र्य कायम राखले जाईल असे स्पष्टीकरण केल्यानंतर याबाबतचा वाद काही प्रमाणात निवळला.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित व शिवकालीन गड व किल्ले यांच्या वैभवशाली वारसा असलेल्या पवित्र ठिकाणी बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला. तर या निर्णयास विरोध करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रियाताई सुळे, उभय सभागृहातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला. तर हा वादग्रस्त निर्णय मागे घेण्याची मागणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KMNp-QAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬