[Navi-Mumbai] - चार साखळीचोरांना अटक

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने साखळीचोरी करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तायलयाच्या हद्दीत केलेले १३ साखळीचोरी व एक मोटरसायकलचोरी १४ गुन्हे उघडकीस आणले. सुमारे आठ लाख २२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींकडून आणखी काही साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून साखळीचोरी करणाऱ्या लुटारूंच्या कारवायांत वाढ झाल्याने या लुटारूंच्या कारवाया रोखण्यासंदर्भात पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून साखळीचोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळविली. त्यानंतर या पथकाने आरोपी गुरुदीपसिंग कश्मिरसिंग पालिया उर्फ जस्सी (३१) आणि कुलदीपसिंग प्रेमसिंग भट्टी उर्फ सोनु (४१) या दोघांना २९ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई परिसरात सहा साखळीचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांकडून सुमारे दोन लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप्त केली आहे. या दोघांवर मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एकूण ३४ साखळीचोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील यांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AI4BeQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬