[Navi-Mumbai] - ट्रान्स हार्बरचे प्रवासी हवालदिल

  |   Navi-Mumbainews

आठवडाभरात चारवेळा लोकल बंद

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

वाशी-ठाणे, ठाणे-नेरूळ-पनवेल आणि त्यापाठोपाठ सीबीडी -खारकोपर या ट्रान्स हार्बर मार्गावर आठवडाभरात चार वेळा ट्रेन बंद पडल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त झाले असून वारंवार ट्रेन बंद होण्याचे हे प्रकार कधी थांबतील, असा प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत. प्रवाशांच्या संयमाचा उद्रेक होण्याआधी प्रशासनाने समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. ठाण्याहून नेरूळ, खारघर, पनवेलकडे शिक्षणासाठी आणि कामासाठी येणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सकाळ, संध्याकाळच्या वेळी गच्च भरलेल्या असतात. नेरूळवरून निघालेली ठाणे लोकल कोपरखैरणे स्थानकात पोहोचेपर्यंत भरून जाते. त्यामुळे कोपरखैरणे स्थानकातून लोकलमध्ये चढणाऱ्यांना धक्के मारत आत शिरावे लागते. तसेच, बऱ्याचदा उभ्यानेच ठाणे स्थानकापर्यंत जावे लागते. हीच परिस्थिती वाशीवरून ठाण्याला जाणाऱ्या लोकलची आहे. पनवेलमध्ये जाण्यासाठीही प्रवाशांना वाशीवरून उभ्यानेच प्रवास करावा लागतो. त्यातच नव्याने सुरू झालेल्या सीबीडी आणि नेरूळ-खारकोपर या मार्गावर तर अर्ध्या आणि पाऊण तासाने ट्रेन धावत असल्याने एक लोकल चुकली तर दुसऱ्या लोकलसाठी अर्धा तास वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे या मार्गावर गर्दीच्या वेळी लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र या मागण्या पूर्ण करणे सोडाच, नेहमीच्या प्रवासातही अनेकदा तांत्रिक अडचणी भेडसावत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/afxdaAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬