[Navi-Mumbai] - भूखंड बळकावणाऱ्या टोळीवर मोक्का

  |   Navi-Mumbainews

बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोच्या भूखंडांची विक्री

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

बनावट कागदपत्रांच्या आधारे सिडकोचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावणाऱ्या टोळीने सिडकोचे अनेक भूखंड संघटितपणे बळकावल्याचे आढळून आल्याने नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टोळीतील त्रिकुटावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. प्रभाकर आत्माराम म्हात्रे (५३), लवेश रघुनाथ जाधव (३९) आणि नरेंद्र माना बारवाडिया उर्फ पटेल (३०) असे मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून आर्थिक गुन्ह्यांमधील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई होण्याची ही नवी मुंबईतली पहिलीच घटना असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील यांनी दिली.

तिघा आरोपींनी आपसात संगनमत करून बेलापूर सेक्टर २०मधील एकूण ६९४ चौ. मीचा कोट्यवधी रुपये किमतीचा भूखंड सिडकोकडून कुणालाही वितरीत झालेला नसताना तो मृत व्यक्ती जोमा बुध्या कोळी यांना सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतून वितरीत करण्यात आल्याबाबतची बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यानंतर या त्रिकुटाने दिनेश पटेल याच्यासोबत त्रिपक्षीय करारनामा करून दिनेश पटेल यांच्या यश बिल्डकॉन कंपनीकडून एक कोटी ८६ लाख रुपयांची रोख रक्कम चेकद्वारे घेतली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेने तिघा आरोपींविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/aPyzRAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬