[Pune] - किती वेळा सांगायचं, मी ‘राष्ट्रवादी’तच...

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणेः 'मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच असून, पक्षातच काम करत आहे, हे किती वेळा सांगायचे...' अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा शुक्रवारी फेटाळून लावल्या. 'या चर्चा माध्यमातूनच सुरू होऊन तिथेच थांबतात' असे म्हणत 'या वृत्तांमागच्या खास सूत्रधारांनी समोर येऊन सांगावे,' असे आव्हानही त्यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या छाननी समितीची बैठक घेतली. या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित होते. त्याआधी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतराच्या चर्चा खोडून काढल्या. 'मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे, येथेच कार्यरत आहे. तरीही या चर्चा सुरू असून, हा दोष माध्यमांचा आहे. कोण सूत्र काय सांगतो, हे त्यांनी स्पष्ट करावे,' असेही ते म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/no7ZoAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8xb2KAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬