[Pune] - पुण्यातच ‘अयोध्या’ व ‘तिरुपती’ही

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

भविष्यात होऊ घातलेल्या अयोध्येच्या भव्य राम मंदिरातील श्रीरामाचे, तिरुपतीच्या बालाजीचे, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे आणि तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन पुणेकरांना पुण्यातच राहून घेता आले, तर? यंदाच्या गणेशोत्सवाच्या देखाव्यांनी ही किमया साधली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना पुण्यातच राहून, तिरुपती, अयोध्या यांसारख्या तीर्थक्षेत्री जाण्याचा अनुभव घेता येणार आहे. शहरातील अनेक मंडळांनी यंदा या प्रसिद्ध मंदिराच्या भव्यदिव्य प्रतिकृती उभारल्या असून, त्या पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करत आहेत.

पुण्याचा गणेशोत्सव अनेक वर्षांपासून हलत्या देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता. आता मात्र त्यात काहीसा बदल झाला आहे. नागरिकांना पुण्यातच कोल्हापूरची महालक्ष्मी, तिरुपती बालाजी, अयोध्येचा श्रीराम, तुळजापूरची तुळजाभवानी, ओडिशातील सूर्यमंदिर अशा मंदिरांच्या प्रतिकृती पाहता येणार आहेत; शिवाय मंडळांनी केवळ प्रतिकृती न उभारता तेथील संस्कृतीचाही देखाव्यात समावेश केल्याने नागरिकांना प्रत्यक्ष मंदिराच्या ठिकाणी गेल्याचीच प्रचितीही मिळेल. आंबिल ओढ्याजवळ असलेल्या साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा अयोध्येच्या संकल्पित राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. तेथून काही अंतर पुढे आल्यास सदाशिव पेठेतील राजाराम मंडळाने कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर साकारले आहे. दरवर्षीप्रमाणेच मंदिरांच्या भव्यदिव्य प्रतिकृतीची परंपरा या मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे....

फोटो - http://v.duta.us/XxVsQwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8yeOzAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬