[Pune] - फक्त ‘महसूल’कडील किल्लेच भाडेतत्वावर

  |   Punenews

किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार

किल्ले लग्न समारंभासाठी दिले जाणार नाहीत

प्रायोगिक तत्त्वावर २५ किल्ले भाडेतत्वावर देण्याचे धोरण

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले; तसेच पुरातत्त्व विभागाकडे असलेले किल्ले वगळता महसूल विभागाच्या ताब्यात असलेले किल्ले पर्यटन विकासासाठी विकसित केले जाणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महसूल विभागाकडील २५ किल्ले खासगी विकासकांना विकासासाठी भाडेतत्वावर देण्याचे धोरण तयार केले जाणार आहे. या किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार असून, ते लग्न समारंभासाठी दिले जाणार नाहीत,' असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी सांगितले.

ऐतिहासिक किल्ले हॉटेल आणि लग्न समारंभासाठी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर गदारोळ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रावळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले; तसेच पुरातत्त्व विभागाकडे असलेले किल्ले वगळून महसूल विभागाकडील किल्ले खासगी विकसकांना पर्यटन विकासासाठी देण्याची योजना आहे. त्यामुळे किल्ल्यांचे संरक्षण होणार आहे. या किल्ल्यांच्या ठिकाणी रोप वे, लाइट अँड म्युझिक, संग्रहालय, ग्रंथालय या सुविधा दिल्या जाणार आहे. मात्र, हे किल्ले लग्न समारंभासाठी देण्यात येणार नाहीत. या किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार आहे. सिंधुदुर्गमधील निवती किल्ला, रत्नागिरीतील हरनय किल्ला आणि नगरमधील मांजरसुंबा किल्ले या योजनेत विकसित होऊ शकतील,' असे रावळ यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pJFRLAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬