[Pune] - लष्कर परिसरातीलआरक्षण केंद्र बंद

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

रेल्वे प्रशासनाने कॅम्प परिसरातील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्र १० सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातून तिकीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या ई-तिकिटांवर अधिक भर दिला जात असून, पुणे रेल्वे स्थानक येथे आरक्षणासाठी पुरेशा खिडक्या कार्यान्वित आहेत. तसेच, अलंकार आणि अपोलो टॉकिज येथे प्रवासी तिकीट सुविधा केंद्र कार्यान्वित आहे. त्यामुळे कॅम्पातील केंद्र बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, यापूर्वी रविवार पेठेतील रेल्वे आरक्षण कार्यालयाची इमारत धोकादायक आढळून आल्याने या इमारतीतील आरक्षण केंद्र एक ऑगस्टपासून बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या केंद्राची इमारत १९५७मध्ये रेल्वेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

फोटो - http://v.duta.us/gkiidgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/qJHSqwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬