[Pune] - वाढीव दंडआकारणीआता निवडणुकीनंतर?

  |   Punenews

'विधानसभे'तील फटका टाळण्यासाठी सरकारचा विचार

म. टा. प्रतिनिधी, पुणे

नागरिकांमध्ये उसळलेली संतापाची लाट आणि सोशल मीडियातील 'ट्रोलिंग'च्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमभंगाच्या वाढीव दंडाच्या आकारणीबाबत राज्य सरकारने 'आस्ते कदम'ची भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर फटका बसू नये, म्हणून ही आकारणी लांबणीवर टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. आगामी आठवडाभरात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही नव्या दंड आकारणीला विरोध दर्शविला आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत जुलैच्या अखेरीस संमत झालेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची एक सप्टेंबरपासून देशात अंमलबजावणी सुरू झाली. त्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमातही बदल करण्यात आला. राज्याच्या परिवहन आयुक्तालयानेही एक सप्टेंबरपासून कायद्याची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना काढून सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. काही राज्यांमध्ये वाढीव दंडवसुली सुरूही झाली आहे. या कायद्याची राज्यात अंमलबजावणी होणार असल्याचे वृत्त माध्यमातून आल्यानंतर जनमानसात विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. दंडाच्या रकमा पाच, दहा आणि वीस हजारांच्या घरात असल्याने सामान्यांनी त्याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता सरकारी पातळीवरही कायद्याच्या अंमलबजावणीला विलंब करण्यात येण्याची शक्यता आहे....

फोटो - http://v.duta.us/NTAP1gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BSHuugAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬