[Pune] - विधानसभाः इच्छुकांच्या ताटी; उजळल्या ज्योती!

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणेः 'कोथरूड'मध्ये मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ..., 'कसब्या'त महापौर मुक्ता टिळक, हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे... अशा सर्व इच्छुकांना आपल्या भेटीचा 'प्रसाद' देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात 'जय गणेश'चा जयघोष केला. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दौऱ्याची शहरभर चर्चा रंगली.

फडणवीस यांनी शुक्रवारी मानाच्या गणपतींसह विविध मंडळांना भेटी देऊन गणरायाची आरती केली; तसेच मानाच्या गणपतींसह कसबा पेठ आणि कोथरूड भागातील इच्छुकांशी संबंधित मंडळांसह खासदार संजय काकडे यांच्याही निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. या संपूर्ण दौऱ्यात आपापल्या मंडळांमध्ये इच्छुकांनी अप्रत्यक्षपणे केलेले 'शक्तिप्रदर्शन' आणि मुख्यमंत्र्यांनी काही कार्यक्रमांना मारलेली दांडी हे चर्चेचे विषय ठरले. खासदार काकडे यांच्या निवासस्थानी गिरीश बापट यांची अनुपस्थिती, तर भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांची असलेली उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. मानाच्या गणपतींपाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर उत्सवप्रमुख नगरसेवक हेमंत रासने यांच्या आग्रहाखातर अभिषेकही केला. केसरी वाड्यास दिलेल्या भेटीत त्यांनी महापौर टिळक यांचे आभार मानले. या वेळी खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांची उपस्थिती होती. त्यानंतर नगरसेवक धीरज घाटे यांच्या साने गुरुजी मंडळास भेट देऊन त्यांनी 'जय श्रीराम'चा नाराही दिला. 'कसब्या'तील सर्व मानाच्या इच्छुकांचे मन त्यांनी राखल्याची चर्चा होती....

फोटो - http://v.duta.us/VLrqxAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2H0v1gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬