[Pune] - ‘सीएम’च्या ताफ्याची रुग्णवाहिकेला वाट

  |   Punenews

पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे 'ग्रीन कॉरिडॉर'चा मार्ग मोकळा

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

शहरातील मानाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी लोहगांव विमानतळावर आगमन झाले. त्याचवेळी सोलापूरहून विमानातून आलेले हृदय अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णवाहिकेत ठेवून मार्गस्थ झाले. हृदय रुग्णालयात वेळेत पोहचविणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा कडेला थांबवून 'ग्रीन कॉरिडॉर'साठी रस्ता मोकळा करण्यात आला. फडणवीस यांनीही पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेला दाद देऊन ताफ्यातील वाहने बाजूला घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे सोलापूरहून आणलेले हृदय विमानतळावरून अवघ्या आठ मिनिटांत रुग्णालयात पोहोचले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शुक्रवारी पुणे भेटीवर आले. विमानतळावरून ते शहरातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी निघाले असता, त्याचवेळी सोलापूरहून हृदय घेऊन आलेले विमान विमानतळावर उतरले. त्यातील हृदय असलेली पेटी रुग्णवाहिकेत ठेवून ती रुग्णालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हृदय वेळेत रुग्णालयात पोहचविणे आवश्यक असल्याने वाहतूक पोलिसांनी 'ग्रीन कॉरिडॉर'ची तयारी पूर्ण केली. वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली....

फोटो - http://v.duta.us/QjaTtQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NUm9zgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬