[Satara] - कडकनाथ प्रकरणी पाटणमध्ये गुन्हा दाखल

  |   Sataranews

कराडः पाटण पोलिस ठाण्यात महारयत अॅग्रो इंडिया प्रा. लि. मी. (कडकनाथ) कंपनी विरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पाटण पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टी. डी. सोनवणे यांनी दिली आहे. या बाबत सचिन काशिनाथ शिर्के यांनी अशी तक्रार दिली आहे. संशयित आरोपी सुधीर शंकर मोहिते, सुभाष शंकर मोहिते, गणेश शेवाळे व संस्थेचे इतर संचालक (रा. सर्व इस्लामपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सप्टेंबर १८ ते आजपर्यंत नमूद कालावधीत कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातून मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून, फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून गुंतविलेल्या फिर्यादीचे २, ०८, ०० रुपयांचे व इतर शेतकऱ्यांचे १,४६,१५,५१९ अशी एकूण १,४८,२३,५१९ रुपये रकमेचा अपहार करून स्वतः चे फायद्याकरिता फिर्यादी व इतर गुंतवणूकदार यांची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी फिर्याद देण्यात आली आहे.

फोटो - http://v.duta.us/u-GeLwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GoHxBwAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬