[Thane] - अग्निशमनमध्ये १०२ स्वयंसेवक

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

वाढत्या शहराला आवश्यक सुविधा देण्यासाठी अग्निशमन विभागाकडून स्वयंसेवक अग्निशमन पथक तयार केले जाणार असून कर्तव्य भत्ता देत या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली शहराचा वाढता विस्तार पाहता शहराला अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसोबत कमीत कमी १०२ स्वयंसेवकाची गरज असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

वाढत्या शहराच्या सोयीसाठी शहरात १२ ते १३ अग्निशमन केंद्रे आवश्यक असून दुसरीकडे वाहनाची संख्या वाढविणेदेखील गरजेचे आहे. यामुळेच अग्निशमन विभागाने नव्याने ५ फायर टेंडर खरेदीची तयारी केली असून प्रशासनानेदेखील यासाठी मंजुरी दिली आहे. नियमित लागणाऱ्या आगी, पूरपरिस्थितीत द्यावी लागणारी मदत किंवा आपत्कालीन परिस्थितीबरोबरच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, छटपूजा आणि पाण्याच्या घटना, डम्पिंगला लागणारी आग या घटनांमध्ये नागरिकांचे रक्षण करण्यासाठी अग्निशमन विभागाकडे असलेली कर्मचारीसंख्या अपुरी असून ही संख्या वाढविण्यासाठी आवश्यक इतकी भरती केली जात नसल्यामुळे अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/a5c1cQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬