[Thane] - एटीएम कार्ड चोरून दागिन्यांची खरेदी

  |   Thanenews

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

महिलेच्या पर्समधून चोरलेल्या एटीएम कार्डद्वारे सोन्याचे दागिने खरेदी केल्याचा प्रकार काशिमीरामध्ये समोर आला आहे. काशिमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २८ वर्षाची महिला बारमध्ये काम करत असून बँकेत खाते उघडण्याच्या वेळी बँकेत काम करणाऱ्या एकाने तिला मदत केली होती. त्यामुळे आरोपीला एटीएम कार्डच्या पिनची माहिती होती. मात्र नंतर आरोपीने बँकेतील नोकरी सोडली. मात्र दोघांमध्ये ओळख असल्याने ते एकमेकांना भेटतही होते. तसेच, आरोपी तिच्या घरीही येत असत. ५ सप्टेंबर रोजी अचानक बँकखात्यातून ९५ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज महिलेला आला. कोणीतरी कार्डचा वापर करून दागिने खरेदी केले होते. संबंधित सराफ दुकानात जाऊन महिलेने दागिने खरेदी करणाऱ्या आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपी हा तिचा ओळखीचा असल्याची बाब समोर आली. २८ ऑगस्ट रोजी आरोपी महिलेच्या घरी आल्यानंतर आरोपीने पर्समधून एटीएम कार्डची चोरी केली. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2pXn9AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬