[Thane] - गटराच्या पाण्याने धुतल्या जातात पालेभाज्या

  |   Thanenews

प्रवाशांकडून व्हिडीओ व्हायरल, भाजीविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या आतील भागातच असलेल्या एका गटाराच्या पाण्यात काही भाजीविक्रेते प्रवाशांसमोरच पालेभाज्या धुत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एका प्रवाशाने आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात असून भाजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

रेल्वेच्या हद्दीत असलेल्या भागात रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनुसार हिरव्या भाज्यांची लागवड केली जात असते, मात्र यापूर्वी अनेकदा याच भाज्यांची लागवड करणाऱ्यांकडून या भाज्या रेल्वेरूळांशेजारी असलेल्या गलिच्छ नाल्यांमध्ये धुतल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या समोरच पाहायला मिळाला. अंबरनाथ रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीनच्या समोरील बाजूस असलेल्या एका गटारातून पावसाचे पाणी वाहत होते. यावेळी या गटाराच्या शेजारी पालेभाज्यांचा ढिगारा ठेवत दोन व्यक्ती पालेभाज्यांची एक एक जुडी या पाण्यात धुत होते. या प्रकारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता. अखेर एका रेल्वे प्रवाशाने हा सर्व गलिच्छ प्रकार आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iIjW-wAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬