[Thane] - डोंबिवलीत वेदपाठशाळा, वृद्धाश्रमचा शुभारंभ

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, कल्याण

प्राचीन भारतीय वेदसंस्कृती शहरातील पुढच्या पिढीत रुजावी, यासाठी डोंबिवलीत वेद पाठशाळा, तसेच आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीमुळे परावलंबी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काचे आपले घर असावे, या जाणिवेतून डोंबिवली प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रम सुरू केले जाणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा शुभारंभ रविवारी, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता डोंबिवली पश्चिमेकडील वृंदावन कॉम्प्लेक्समध्ये होणार असल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

डोंबिवली पश्चिम विभागात पाच हजार चौरस फुटाच्या वास्तूत वेद पाठशाळा आणि वृद्धाश्रम सुरू केला जाणार असून या पाठशाळेत वाचनालय, वेदपठण, निवासी गुरुकुल व्यवस्था, याज्ञिकी शिक्षण असे पूर्ण वेद पठणाचे प्रशिक्षण दिले जाईल. तर ५० सुसज्ज बेडची सुविधा असलेल्या वृद्धाश्रमात वृद्धांची मोफत काळजी घेतली जाणार असल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/yWL68QAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬