[Thane] - मेट्रोचे आज भूमिपूजन

  |   Thanenews

कल्याण-डोंबिवली-तळोजे मेट्रो दृष्टिपथात

निवडणुकीपूर्वीची लोकप्रतिनिधींची धावपळ

पंतप्रधानांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

कल्याण मेट्रो पाच आणि नवी मुंबई मेट्रोला जोडणाऱ्या कल्याण-डोंबिवली-तळोजे मेट्रो मार्ग १४चे भूमिपूजन आज, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भूमिपूजनातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कल्याण मेट्रोच्या भूमिपूजनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचा दावा डोंबिवलीत सुरू झाला आहे. तर, गेल्या अडीच वर्षांची मागणी वास्तवात आल्याचा दावाही सुरू झाल्यामुळे राजकीय मित्रपक्षांमधील चढाओढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे कल्याण-डोंबिवली-तळोजे ही तीनही शहरे जोडली जाणार असल्यामुळे या मेट्रोमार्गाचा लाखो प्रवाशांना उपयोग होणार आहे.

रेल्वेवरील वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाची निर्मिती होत असून सर्वाधिक गर्दीच्या डोंबिवली शहराला मेट्रोच्या जाळ्यातून वगळल्याचे चित्र निर्माण झाले होते. एकिकडे नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्प पूर्ण होत असून दुसरीकडे ठाणे आणि कल्याण मेट्रो प्रकल्पाचेही भूमिपूजन झाल्यामुळे डोंबिवलीच्या नागरिकांची चलबिचल सुरू होती. डोंबिवली शहरातील नागरिकांना मेट्रोपासून वंचित ठेवल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना पसरली होती. कल्याण मेट्रो मार्गाच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो मार्गाची घोषणा करून कल्याण-डोंबिवली-तळोजे मेट्रो १४ मार्ग विकसित करण्याचाही दावा केला. प्रत्यक्षात त्यापूर्वीच या मार्गाची चाचपणी एमएमआरडीएकडून करण्यात आली होती. त्याचा सविस्तर विकास आराखडाही तयार करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकल्पाविषयी अनेक संभ्रम निर्माण होत होते. अखेर तांत्रिक बाबी पूर्ण करून एमएमआरडीएकडून विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधानांच्या हस्ते या नव्या मेट्रो मार्गाच्या भूमिपूजनाचा घाट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0lijXQAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬