महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

  |   Akolanews

लोकमत न्यूज नेटवर्क

मूर्तिजापूर: अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाकडून त्यासाठी रीतसर परवानगी घेतली असली तरी पर्यावरणाचा ºहास होत आहे.

एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रचंड पैसा खर्ची घालत असताना शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. याच पद्धतीने अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर या ५२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने गती घेतली आहे. रस्त्याचे ७ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व दीड-दोनशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या ९९७ व बाभळीसह हजारो महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे....

फोटो - http://v.duta.us/7J0ufwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Gpt0ewAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬