[Aurangabad-Maharashtra] - ‘आरएसएस’ विचारी लोकांमुळे वंचित बहुजन आघाडी- एमआयएममध्ये विघ्न: जलील

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आसपास काही आरएसएसचे लोक आलेले आहेत. त्यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होत नाही. एकतर्फी आठ जागा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएम प्रदेशाध्यक्ष किंवा एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची जागा वाटपाची चर्चा सुरू नाही असे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे जाहीर करावे. असे मत एमआयएम प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केले.

एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत इम्तियाज जलील यांनी पक्षाची बाजू सादर केली. यावेळी जलील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीत खासदार ओवेसी आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर ९४ जागेची यादी केली होती. यात सुधारणा करून ७४ जागेची यादी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ईमेलवर देण्यात आली होती. या यादीवर आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीत जागेवर चर्चा होण्यापेक्षा लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यानंतरही आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निर्णयाची वाट पाहात होतो. यानंतरही ओवेसी आणि आंबेडकर यांची पुण्यात तीन तास बैठक झाली....

फोटो - http://v.duta.us/5K-DzwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EBw5vAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬