[Aurangabad-Maharashtra] - मोदक सादरीकरण स्पर्धा मंगळवारी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी,

महाराष्ट्र टाइम्स, जय चतुर्थी प्रतिष्ठान व गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्यातर्फे मंगळवारी (दहा सप्टेंबर) दुपारी तीन वाजता एन-सात येथील गरवारे कम्युनिटी सेंटर येथे मोदक सादरीकरण स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होताना घरी तयार केलेले मोदक आणावेत. सोबत त्याची रेसिपी लिहून आणावयाची आहे.

गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये गणेशोत्सवानिमित्त सर्वांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवारी (दहा सप्टेंबर) रोजी दुपारी ठीक तीन वाजता येथे होणार आहे. यासाठी सर्वांनी मोदक घरीच तयार करून आणावेत. त्याचप्रमाणे त्याची रेसिपी सांगणे आवश्यक आहे. शिवाय रेसिपी लिहून सोबत आणावी. एका स्पर्धकाने एकाच मोदकाचा प्रकार तयार करून स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसह मांडणे आवश्यक आहेत.

मोदकाचे तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे मोदक स्पर्धेसाठी चालतील. प्रत्येक स्पर्धकास मांडणीसाठी दहा मिनिटे वेळ देण्यात येईल, नाव नोंदणी आवश्यक आहे ही स्पर्धा विनामूल्य असून, जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, जय चतुर्थी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन खैरे; तसेच महिला विभागप्रमुख सुलभा जोशी यांनी केली आहे. स्पर्धेच्या वेळेपूर्वी १५ मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९८२२६३०५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

फोटो - http://v.duta.us/SZ9qjwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZBHlyQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬