[Mumbai] - काँग्रेससोबत युती करणार नाही: प्रकाश आंबेडकर

  |   Mumbainews

मुंबई: 'राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,' असं 'वंचित'चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईतील एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी ही घोषणा केली. भारिप बहुजन महासंघ व 'एमआयएम'च्या वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती. औरंगाबादमध्ये आघाडीचा खासदारही निवडून आला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत 'वंचित'ला विशेषत: प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरू केले होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादीला वगळून काँग्रेससोबत युती करण्यात रस होता. त्यासाठी त्यांनी थेट ५० टक्के जागांची मागणी काँग्रेसकडं केली होती. त्याला काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं आंबेडकरांनी आज 'एकला चालो रे'चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली....

फोटो - http://v.duta.us/_McAvgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hkZ7PAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬