[Mumbai] - नेरूळमध्ये बनणार राज्याचे पहिले डिटेंशन सेंटर

  |   Mumbainews

मुंबई: राज्यातील बेकायदेशीर स्थलांतरितासांठी (घुसखोर) नवी मुंबईतील नेरूळ येथे महाराष्ट्रातील पहिले डिटेंशन सेंटर उभारण्यात येणार आहे. राज्याच्या गृह विभागाने गेल्याच आठवड्यात सिडकोला पत्र पाठवून डिटेंशन सेंटरसाठी नेरूळमध्ये तीन एकर जागेची मागणी केली आहे.

आसाममध्ये नुकतीच राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आसाममध्ये सुमारे १९ लाख लोक यादीबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

गृह विभागातील सूत्रांनी मात्र नेरूळ येथे प्रस्तावित डिटेंशन सेंटरची नेमकी जागा कोणती याबाबत माहिती देण्यास नकार दिला. या जागेवर सध्या एक भवन असून एक सामाजिक संस्था तिचा वापर करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. डिटेंशन सेंटरसाठी जागा निवडण्याची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू करण्यात आली असून तसे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्याची माहिती राज्याच्या गृह विभागाचे मुख्य सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले....

फोटो - http://v.duta.us/6PgtqQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Sj6gdQEA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬