[Mumbai] - फडणवीस सरकारचा षटकार; शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतले ३७ निर्णय

  |   Mumbainews

मुंबई: मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या सरकारच्या या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेटची बैठक घेतली. जाता जाता फडणवीस सरकारने एक-दोन नव्हे तर ३७ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी त्यांच्या क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्ज माफ करणे, कुष्ठरोग पीडितांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणे, दिव्यांगासाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करणे, मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वॉटर ग्रीडला मंजुरी, बचतगटांना कुक्कुटपालनासाठी निधी आदी महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहे. या शेवटच्या कॅबिनेटमध्ये विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे निर्णय घेताना शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल राखण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठीकत ३७ निर्णय घेण्यात आले . या सरकारची ही शेवटची कॅबिनेट बैठक होती, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गणेशोत्सवानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने जाता जाता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत....

फोटो - http://v.duta.us/gWPbWwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/NWhEgQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬